ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तो पर्यत पाकिस्तानवर कारवाई होणार नाही ; आंबेडकर यांची सरकारवर टीका !

अकोला : वृत्तसंस्था

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. या हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारतीय जनतेकडून पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मात्र पहलगाममधील हल्ल्याच्या घटनेला आठवडा उलटून गेला तरी अद्याप याबाबत कोणताही कठोर निर्णय घेण्यात आलेला नाही. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये आता लॉबिंग सुरू झाल्याचा आरोप सुद्धा आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार जेसन मिलर यांची नेमणूक पाकिस्तानविरोधी लॉबिंगसाठी करण्यात आली आहे. आम्ही भाजपाला विचारत आहोत की जेसन मिलर यांची तुम्ही नेमणूक केली आहे का? डोनाल्ड ट्रम्प आदेश देत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानविरोधात कारवाई करणार नाही का? याबाबत त्यांनी उत्तर द्यावं.”

पाकिस्तान विरोधात लॉबिंग करण्यासाठी मिलर यांना दीड लाख डॉलर मिळणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळाली आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘युनायटेड नेशन्सने कारवाई रोखण्याची भूमिका घेतली असतानाच आता लॉबिंग सुरू झाल्याचं स्पष्ट होत आहे. पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने ४ दिवसांपूर्वीच या संदर्भातील माहिती दिली होती, तेव्हा भारताने यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली नव्हती. आता मात्र पाकिस्तानमधील अनेक यूट्यूब चॅनेल्स बंद झाले आहेत.”  असं आंबेडकर म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!