ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अवकाळी पावसाने घेतला शेतकऱ्याचा बळी !

बीड : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या दोन दिवसापासून अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना अनेक ठिकाणी अजून देखील पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याची घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. पाली गावात जनावरे सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. आत्माराम निवृत्ती राऊत असं मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत शेतकरी आत्माराम राऊत हे आपल्या शेतामध्ये जनावरे चारत होते. या दरम्यान पावसाचे वातावरण निर्माण होऊन विजांचा कडकडाट झाला आणि वीज कोसळली. त्यामध्ये शेतामध्ये असलेल्या आत्माराम राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.दरम्यान बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. यात शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला रब्बीचा घास वाया गेला आहे. ज्वारी भुईसपाट झाली, तर कापसाच्या वाती झाल्यात. त्याचबरोबर कांदा, हरभरा याचं देखील मोठं नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!