ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला मराठी राजभाषा दिन

अक्कलकोट दि,२७-विश्वगुरू म.बसवेश्वर साहित्य परिषद,महाराष्ट्र यांच्यावतीने आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राज भाषा गौरव दिन उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.

बनजगोळ रोड,माणिक पेठ येथील अँग्लो उर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनीनी “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या अभिमान गीताचे वाचन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. अध्यक्षस्थानी डॉ. सहारा मोमीन-सलगरकर ह्या होत्या.

 

मोमीन यांनी सांगितले, अक्कलकोट सारख्या कानडी प्रभाव असणाऱ्या सीमावर्ती भागात मराठी अस्मिता खऱ्या अर्थाने विश्वगुरूने जिवंत ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक व स्वागत साहित्य परिषदेचे अध्यक्ष स्वामींनाथ हरवाळकर यांनी केली.त्यांनी सांगितले गेल्या बारा वर्षा पासून कानडी, इंग्रजी,उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यां मध्ये मराठीची आवड निर्माण होणे कामी अनेक उपक्रम राबवित आहे.गेल्यावर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मराठी अत्यावश्यक असल्याचा कायदा सरकारने संमत केला.न्यायालयात, प्रशासनात मराठी भाषा व्यवहार सुरू झाली आहे.

मराठी भाषा संवर्धनासाठी व मराठी ज्ञान-रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी मराठी विद्यापीठ होणे गरजेचे असल्याचे हरवाळकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी रंगी-बेरंगी मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा फलक फडकाऊन शुभेच्छा दिल्या.महिबूब सलगरकर यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केली.

या वेळी मुख्याध्यापिका नसरीन शेख,शमीम जमादार,फर्जना बागवान, जुलेखा बागमारु,तस्लिम शेख आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

आर्यक्रमाचे संयोजन मौलाली बागवान यांनी केले.आभार वसीम पिरजादे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!