मुंबई : राज्यात १८ – ४४ वयोगटातील लसीकरण थांबणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाची लस केंद्राकडून उपलब्ध होत नाही. त्यामुळे आज १८- ४४ वयोगटातील राज्य शासनाने खरेदी केलेले कोविड व्हॅक्सिंग हे आता ४५ च्या पुढच्या वयासाठी वापरले जाणार आहे.
लस उपलब्ध नसल्याने १८ – ४४ वयोगटासाठी लसीकरणं स्लो डाऊन करावे लागेल का अशी चर्चा झाली आहे.या संदर्भात उद्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
राज्यात कोरोना विरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. टेस्टिंग कुठेही कमी झालेले नाही. दोन लाख टेस्टिंग केले जात आहेत. राज्यात आतापर्यंत एक कोटी ८४ लाख लसीकरण झाली आहे. ४५ वर्षांच्या वर लोकांसाठी ३५ हजार व्हॅक्सिंन उपलब्ध आहेत.राज्यात अॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा हा ६ लाखाच्या खाली आला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांवर आले आहे.अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.