---Advertisement---

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ,मनीलॉंडरींग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सीबीआयकडे देशमुख यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.

हे प्रकरण आर्थिक गुन्ह्यांशी निगडित असल्यामुळे आता अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने ही राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!