दुधनी : प्रतिनिधी
शांभवी फाउंडेशन अध्यक्षा तसेच आझाद शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्षा वैशाली शंकरराव म्हेत्रे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मातोश्री लक्ष्मीबाई सा.
म्हेत्रे प्रशाला दुधनी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.यानिमित्ताने शाळेअंतर्गत निंबध स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.या
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
याशिवाय वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना खाउ वाटप करण्यात आले. दुधनी येथे गोरगरीब महिलांना रोजगार मिळावा म्हणून स्वखर्चाने गारमेंट व्यवसाय सुरुवात केली. या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. या पुढच्या काळातही महिलांमधील बेरोजगारी कमी होण्यासाठी आपण प्रयत्न करू,असे वैशाली म्हेत्रे यांनी सांगितले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरणगौडा पाटील, सुनील आडवितोटे, कल्याणी करडे परिश्रम घेतले.यावेळी संस्थेचे चेअरमन शंकर म्हेत्रे, प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धाराम पाटील,संस्थेचे सहसचिव महादेव खेड , रामचंद्र गद्दी इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. यानिमित्त उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी वैशाली म्हेत्रे यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.