ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ : आणखी ७ दिवसांची पोलीस कोठडी !

बीड : वृत्तसंस्था

गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यातील सरपंच खून व खंडणी प्रकरण देशभर गाजत असतांना आता खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मिक कराड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यातील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या रिमांडवर आता केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांकडून नवनवीन दावे आणि माहिती कोर्टासमोर सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसआयटीने 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.

वाल्मीक कराडला विशेष मकोका न्यायालयाने 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. मकोका कायद्यांतर्गत ही कोठडी देण्यात आली आहे. या 7 दिवसांत वाल्मीक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग होता का? यासह विविध बाबींची चौकशी एसआयटी करणार आहे.

वाल्मीक कराडला जेलकडे नेत असताना बीड न्यायालयाबाहेर वाल्मीक कराडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले. वाल्मीक कराडला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी वकील हेमा पिंपळे यांनी केली आहे. यावेळी वाल्मीक कराड समर्थक आणि विरोधकांची एकमेकांसमोर घोषणाबाजी केली. पोलिसांनी वाल्मीक कराड समर्थकांना ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!