अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत आळीपाळीने काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षाची अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सत्ता आहे.परंतु आत्तापर्यंत वीज,पाणी आणि रस्ते या तीन गोष्टीवर ७५ वर्षे झाले राजकारण सुरू आहे. यात बदल व्हावा म्हणून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत,असे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शुक्रवारी,त्यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. येथील प्रस्थापित व्यवस्थेची माझा लढा राहील. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष उलटून गेले तरीही भूमिपूजन थांबेना आणि यांच्या टक्केवारीमुळे अनेक तरुण बेरोजगार झाले.अनेक जिल्हा परिषदचे शाळा बंद पडल्या.बहुजन समाजातील मुले शाळा शिकण्याचे बंद केले.या ठिकाणी गोरगरिबांना चांगली आरोग्यसेवा पुरवण्यासाठी दवाखाना नाही.मैंदर्गी रोडला जुनीच एमआयडीसी आहे.त्याला पुनर्जीवित करून तरुणांच्या हाताला काम देणे आणि शेतकरी बांधवांना नदी जोड प्रकल्प करून पाणी बारा महिने मुबलक करून देणे याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी येत्या २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अर्ज भरणार आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मडीखांबे म्हणाले, रोजगार अभावी आज हजारो तरुण स्थलांतर झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यात काम नाही.
बेरोजगारी प्रचंड प्रमाणात तालुक्यात आहे. त्यावर कळस म्हणजे महागाई भरमसाठ वाढलेली आहे आणि शेतकरी बांधवांच्या मालाला हमीभाव नाही म्हणून तो हवालदिल झालेला आहे.याच्यावर उपाय करण्यासाठी आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत,असे त्यांनी सांगितले.यावेळी शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता रविराज पोटे, गंगाराम गायकवाड, उत्तम गायकवाड, गौतम गायकवाड ,राम सोनकांबळे, आकाश पाटील, संदीप इंगळे, संतोष गायकवाड,राजू वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.