ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं.

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दिलीप कुमार यांना ६ जूनला रुग्णालयात भरती करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यांच्या फुप्फुसात पाणी भरल्यानं त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या फुप्फासातील पाणी काढल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी देखील वाढू लागली होती. प्रकृतीत सुधारणा पाहून अभिनेते दिलीप कुमार यांना ११ जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.

मात्र पुन्हा एकदा दिलीप कुमार यांना पुन्हा श्वास घेण्यासाठी अडचण येत असल्यानं ३० जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी ही माहिती दिली होती. अखेर बुधवार ७ जुलैला पहाटे दिलीप कुमार यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव युसूफ खान होतं. मात्र बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी त्यांचं नाव बदलून दिलीप कुमार असं केलं. एका निर्मात्याच्या सांगण्यावरून त्यांनी नाव बदललं होतं. त्यानंतर चाहते त्यांना दिलीप कुमार म्हणून ओळखू लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!