ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधानसभा निवडणूक रणधुमाळी ‘दिवाळी’नंतरच !

मुंबई : वृत्तसंस्था

केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरयाणातील निवडणुकीच्या तारखांची शुक्रवारी घोषणा करताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा मात्र केली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक ही दिवाळीनंतरच म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार या चर्चेला बळ मिळाले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोन राज्यांची निवडणूक जाहीर केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रातील निवडणूक कधी घेणार, असा प्रश्न केला असता त्यांनी स्पष्ट केले की, २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणूक एकत्रितपणे घेण्यात आली होती. त्यावेळी जम्मू-काश्मीरची निवडणूक हा विषयच नव्हता. मात्र, आता आम्हाला पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घ्यायची आहे. त्यातील जम्मू-काश्मीर, हरयाणाची निवडणूक आम्ही जाहीर केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड या दोन राज्यांची निवडणूक यावर्षी घ्यायची आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला दिल्ली विधानसभेची निवडणूक व्हावयाची आहे. महाराष्ट्रात मोठा पाऊस पडत आहे आणि सणासुदीचेही दिवस आहेत असे म्हणत राजीव कुमार यांनी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेतच एकप्रकारे दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!