ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विजय कोरे म्हणजे चपळगावचा चालता बोलता इतिहास – सरपंच उमेश पाटील यांची ग्वाही, कोरे यांचा पदोन्नतीबद्दल नागरी सत्कार

अक्कलकोट, दि.२१ : चपळगावच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गेल्या २३ वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा काम करणाऱ्या विजय कोरे यांना गावातील प्रत्येक
कुटूंबाचा इतिहास अवगत झाला आहे. अव्वा,अक्का,मावशी, बाबा, काका, मामा अशी गोड भाषा वापरत विजय कोरे यांनी प्रत्येक चपळगाववासियांची मने जिंकली आहेत. प्रामाणिकपणे सेवा करत विजय कोरे हे चपळगावच्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार बनले असून ते जणू काही चालता बोलता इतिहासाचे घटक असल्याचे प्रतिपादन सरपंच उमेश पाटील यांनी
व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या विशेष कोट्यातुन ग्रामपंचायतीचे कर्मचारी ते आरोग्य सेवक अशी पदोन्नती झालेल्या विजयकुमार कोरे यांचा चपळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात सरपंच उमेश पाटील बोलत होते.

प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर ग्रामसेवक एस बी कोळी, युवा नेते बसवराज बाणेगांव, संजय बाणेगांव, सिध्दाराम भंडारकवठे,प्रकाश बुगडे, ग्रा.पं.सदस्य वर्षा भंडारकवठे, परमेश्वर वाले,गणेश कोळी,महिबूब तांबोळी,प्रदिप वाले,श्रावण गजधाने,ज्ञानेश्वर कदम, विशालराज नन्ना, सुरेश सुरवसे, माजी सदस्य सुधाकर शेळके, शशीकांत लादे, सुनिल नागुरे,सिध्दाराम डोळ्ळे गुरूजी,भुमिपुत्र संघटनेचे खंडू वाले, शरणू ख्याडे,बम्मु म्हमाणे, सोमनाथ बाणेगांव आदी उपस्थित होते.

यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन संजय बाणेगांव यांनी मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की विजय कोरे हे प्रामाणिक व्यक्ती आहेत.त्यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या जागेवर योग्य व्यक्तीची निवड होण्यासाठी सरपंच उमेश पाटील व सदस्यांनी जबाबदारी घ्यावी. बसवराज बाणेगांव म्हणाले की,विजय कोरे यांची पदोन्नती झाल्याने चपळगावच्या जनतेमध्ये समाधान झाले आहे.मात्र चपळगावची ग्रामपंचायत पोरकी झाल्याची भावना व्यक्त केली.

सामाजिक कार्यकर्ते सिध्दाराम भंडारकवठे यांनीही मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की,गेल्या तीन दशकांपासून चपळगावच्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार असलेल्या विजय कोरे यांची उणीव यापूढील काळात प्रकर्षाने जाणवेल.गावच्या जडणघडणीसाठी अशा लोकांचे महत्व लाखमोलाचे आहे. यावेळी ग्रामसेवक एस बी कोळी, ज्ञानेश्वर कदम सर,श्रावण गजधाने,परमेश्वर वाले आदींनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजय कोरे व सौ.मंगल कोरे या दांपत्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भुमिपूत्र संघटना, सरपंच उमेश पाटील परिवार, ग्रामसेवक एस बी कोळी परिवार आदींनी कोरे परिवाराचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनासह शंभूलिंग अकतनाळ यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!