ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सरपंच देशमुख खुनातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट ; आ.धसांनी घेतली भेट !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. यातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक होणे गरजेचे असून त्यांना फरार करणाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे. ग्रामस्थांच्या आठ मागण्या मान्य झाल्या तर त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.

सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की, पंकज कुमावत यांना बीडचे ॲडिशनल एसपी म्हणून नियुक्त केले पाहिजे. तर पोलिसांचे हेड बदलले तर पोलिसही बदलावे अशी मागणी त्यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना केली आहे.

सुरेश धस म्हणाले की, आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळेत आहे, याचे सर्व पुरावे आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. हे प्रकरण 100 टक्के जलदगती न्यायालयात चालणार असेही त्यांनी म्हटले आहे. एसआयटीमध्ये दोन सायबर तज्ञ असायला हवे अशी मागणी मी केली आहे.

सुरेश धस म्हणाले की, महाजन आणि राजेश पाटील यांच्यावर सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात यावी. कृष्णा आंधळे याला अटक झाली पाहिजे. कारण त्यांचे बगलबच्चे जर 307 सारखा गुन्हा करत आहे. आरोपी जेव्हा कोर्टात तारखेसाठी येत आहे तेव्हा त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी केस वाढलेले चित्र-विचित्र लोकं येत आहे. यासह वाशी पोलिस स्टेशनेचे गिते, फड, यांचे सीडीआर तपासून त्यांना सहआरोपी करावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

सुरेश धस म्हणाले की, आरोपींना जेलमध्ये मदत करणारे लोकं निलंबित झाले पाहिजे. एसपी जरी बदलले असले तरी खालची यंत्रणा तीच आहे. या परिसरातील पोलिस दल बदलणे गरजेचे आहे. ते आरोपींना मदत कशी होईल यासाठी ते प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात यांची दहशत कायम आहे. संतोष देशमुख यांच्यापूर्वीही एक घटना घडली पण त्यांना न्याय दिला नाही. हे सर्व महाजनसमोर झाले पण तरीही महाजन तिथेच राहिले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!