ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विराट कोहली पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था 

 

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत विराट कोहलीला यश मिळवता आले नसल्याने टीम इंडियाला मोठा पराभवाच्या रुपाने मोठा फटका बसला. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक ठोकलं खरं पण त्यानंतर लय कायम ठेवण्यात अपयशी ठरला. असं असताना विराट कोहलीचं कसोटी करिअर संपलं असा दावा करण्यात येत आहे. पण टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी एक आश्चर्यकारक दावा केला आहे. रवि शास्त्री यांनी कोड स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, ‘माझ्या मनात कोणतं किंतू परंतु नाही, विराट कोहली पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी खेळायला येईल.’ इतकंच काय तर रवि शास्त्री यांनी छाती ठोकून सांगितलं की, ‘माझे शब्द लिहून घ्या. विराट कोहली ऑस्ट्रेलियात पुन्हा कसोटी मालिका खेळायला आला तर मला कोणतंच आश्चर्य वाटणार नाही.’ रवि शास्त्री यांच्या दाव्यामुळे विराट कोहली आणखी काही वर्षे क्रिकेट खेळेल असं दिसत आहे. ऑस्ट्रेलियात फेल गेला असला तरी विराट कोहलीने माघार घेतलेली नाही.

रवि शास्त्री यांच्या दाव्यानुसार, ‘विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावरही जाण्याची शक्यता आहे.’ विराट कोहलीचं वय आता 36 असून 40 वर्षांपर्यंत असं म्हणावं लागेल. कारण पुढच्या दोन वर्षात टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जाणार नाही. उलट ऑस्ट्रेलिया भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे. असं सांगताना रवि शास्त्री यांनी त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. फॉर्मात परतण्यासठी देशांतर्गत क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं. विराट कोहली मागच्या 13 वर्षांपासून रणजी खेळलेला नाही. त्याने 2012 मध्ये दिल्लीसाठी शेवटचा फर्स्ट क्लास सामना खेळला होता. त्यामुळे रवि शास्त्री यांचा दावा पाहता विराटला अजून चार वर्षे क्रिकेट खेळावं लागले. त्यामुळे असं शक्य नसल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.

 

विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वात खराब कामगिरी केली. त्याने 23.75 च्या सरासरीने 190 धावा केल्या. यात पर्थ कसोटीतील शतकाचा समावेश आहे. त्यानंतर उर्वरित चार कसोटीत त्याने 90 धावा केल्या. विराट कोहली या मालिकेत ऑफ स्टंपबाहेरील चेंडू खेळताना वारंवार बाद झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!