ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विराट कोहलीने सोडलं टीम इंडियाच्या कसोटी संघाचं कर्णधार पद

मुंबई : विराट कोहलीने टीम इंडियाच्या कसोटी संघाचं कर्णधार पद सोडलं आहे. कर्णधार पदाचा विराटने राजीनामा दिला असून ट्विट करून त्याने ही माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्या नंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

‘टीमला योग्य दिशेने नेण्यासाठी गेल्या ७ वर्षांपासून कठोर मेहनत घेतली आणि अथक प्रयत्न केले. मी प्रामाणिकपणे काम केले. परंतु कधी-कधी तुम्हाला थांबावे लागते आणि माझ्यासाठी कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची हीच योग्य वेळ आहे’, असं विराटने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विराट कोहली भारतीचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. २०१४ मध्ये विराटकडे टीम इंडियाच्या कसोटी संघाची धुरा आली. गेल्या सात वर्षात विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ने ६८ कसोटी सामने खेळले. यात टीम इंडियाला ४० विजय मिळाले, १७ लढतीं मध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर ९ लढती अनिर्णितर्णि राहिल्या.

कर्णधार असताना विराटची फलंदाजीत कामगिरीही जबरदस्त आहे. ६८ कसोटीतील ११३ डावांमध्ये फलंदाजी करताना विरटने ५४.८० च्या सरासरीने ५८६४ धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या २० शतकांचा आणि १८ अर्ध शतकांचा समावेश आहे. नाबाद २५४ ही त्या च सर्वोच्च धावसंख्या आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच त्याने टी -२० संघाचे कर्णधारपद सोडले होते, तर वनडे संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आले होते. त्याच्या जागी रोहित शर्माकडे टी -२० आणि वनडे संघाचं कर्णधारपद देण्यात आलं होतं.

आता कसोटी संघाचं कर्णधारपदही विराटने सोडल्याने तिथेही रोहितची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुबदुईमध्ये झालेल्या टी -२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने आपण टी -२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवत असताना कामाचा ताण पडत असल्याचे विराटने म्हटलं हो तं. त्यानंतर विराट कोहली एक दिवसीय संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. मात्र त्याने घोषणा करण्यापूर्वीच बीसीसीआयने रोहि त शर्माकडे टी -२० सह एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!