ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महात्मा गांधीजीच्या जीवनप्रवासातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास भेट द्यावी; तीन दिवसीय प्रदर्शनाचे अक्कलकोट येथे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१ : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड़ा निमिताने महात्मा गांधीजीच्या जीवनप्रवासातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास नागरिकानी भेट द्यावी, असे आवाहन सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी यांची जयंती हा कालावधी “सेवा पंधरवड़ा” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर, जिल्हा प्रशासन, सोलापूर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान, अक्कलकोट यांच्या संयुक्‍त विदयमाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वाहनतळ येथील जागेत आयोजित महात्मा गांधीजींच्या जीवनप्रवासात दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी बोलत होते.

 

प्रारंभी या प्रदर्शनाचे उदघाटन खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते फित कापून व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान समितीचे चेयरमन महेशराव इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे सचिव श्याम मोरे, निवासी नायब तहसिलदार विकास पवार, महावितरणचे उप अभियंता संजीवकुमार म्हेत्रे, भूमी अभिलेखचे उप अधीक्षक शिंगणे आणि केंद्रिय संचार ब्यूरोचे निवृत्त अधिकारी सतीश घोडके आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना

खासदार महास्वामीजी म्हणाले की, सेवा पंधरवड़ा निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहेत.
याचा एक भाग म्हणून आज येथे आयोजित गांधीजीच्या जीवनावरील प्रदर्शन मध्ये स्वातंत्र्य संग्रामातील महात्मा गांधींच्या जीवनांशी संबधित महत्वपूर्ण घटना, त्यांनी भेट दिलेल्या व सत्याग्रह केलेल्या ऐतिहासिक स्थळाविषयी माहिती देणाऱ्या दुर्मिळ चित्र आहेत. ते फक्त आपल्याला या प्रदर्शानामधुन बघायला मिळतात. या प्रदर्शनाची माहिती सर्व माध्यम व पदाधिका-यानी जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचविण्याचे आवाहान यावेळी त्यानी केले.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले की, या सेवा पंधरवडा कालावधीत शासनाच्या विविध विभागातील प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा मोठ्या प्रमाणात होणार आहे. या प्रदर्शनामध्ये महात्मा गांधीजीच्या जीवनांशी संबधित घटना, त्यांनी भेट दिलेली ठिकाणे, तसेच त्यांनी केलेल्या सत्याग्रह विषयीची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन खूप चांगले असून सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच यातून बोध घ्यावा, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.इंगळे म्हणाले की स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणारे भक्त महात्मा गांधीजी यांच्या कार्याची प्रेरणा येथून घेऊन जातील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यानी केले.

उदघाटनानंतर शाहीर भैरव मार्तंड सांस्कृतिक कला मंडल तर्फे महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछ्त्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, मनोज निकम, सनी सोनटक्के, प्रवीण घाडगे, मंडळ अधिकारी ओंकार माने, तलाठी पंचप्पा म्हेत्रे, अभियंता अमित थोरात,केंद्रिय संचार ब्यूरोचे जे.एम हन्नुरे आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!