---Advertisement---

स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या दुधनीत विविध कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.१ : दुधनीचे माजी नगराध्यक्ष स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमीत्त दुधनी (ता.अक्कलकोट) येथे सामाजिक बांधिलकीतुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मार्केट कमिटीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी दिली.

 

यावर्षी अक्कलकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, जनावरांमध्ये पसरलेला लंपी आजारामुळे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांची पुण्यतिथी साजरी करणार असल्याची माहिती सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी दिली.

रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी दुधनी येथे सकाळी पशुधनासाठी लंपी लसीकरण,कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून याचे उद्घाटन म. नि. प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते होणार आहे या शिबिराचा पशुपालक व जनतेने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी सभापती शंकर म्हेत्रे ,महिला अध्यक्ष शीतल म्हेत्रे, सुभाष परमशेट्टी, रामा गद्दी, गुरू हबशी, विश्वनाथ हडलगी, अशोक धोनी, सचिव एस.एस.स्वामी, डाॅ.उदय म्हेत्रे, संगम म्हेत्रे, शशिकांत सावळसुर, राजु म्हेत्रे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!