अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट शहरापासून वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्सव काळात ठेर (रथ) ओढणे या धार्मिक कार्यक्रमामध्ये अचानकपणे रथाच्या चाकाची पार निसटल्याने दुर्घटना होवून दोघे भाविक गंभीर जखमी होवून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सुर्यास्ताच्या दरम्यान घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत प्राप्त मिळालेली अधिक माहिती अशी की, वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात चालु होती. मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागातून भाविक यात्रेकरिता जमले होते. यात्रेतील मुख्य घटक रथ ओढणे परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक रथ ओढतात. सुमारे १२ फुट रुंदी असलेला रथाचे गोलाकार दगडी चाक आहेत.रथ ओढणे हा धार्मिक विधीवेळी परमेश्वर महाराज की जय…! ची घोषणा देतात व रथावर खारीक प्रासादिक वस्तूंचे उधळण करतात. यंदा सूर्यास्ताच्या दरम्यान हा रथ ओढत असताना अचानकपणे ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केले जात आहे. या दुर्घटनेत इरणणा गिरमलला नंदे आणि गंगाराम तिपन्ना मंजुळकर हे गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. यादरम्यान एक पोलिस अधिकारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर वागदरी येथील परमेश्वर यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कळते.दरम्यान अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.डीवायएसपी राजेंद्रसिंह गौर,पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी,तहसीलदार बाळासाहेब सिरसट, गटविकास अधिकारी सचिन खुडे,तालुका वैदयकीय अधिकारी असे सर्व जण घटनास्थळी दाखल झाले आहेत.