ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष

बीड, वृत्तसंस्था 

 

बीडमध्ये लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा नवीन वाद उफाळला आहे. खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मिक कराड लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मीकचे या योजनेचे अध्यक्ष पद कायम असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तो परळी येथील लाडकी बहीण योजना समितीच्या पदावर अजूनही कायम आहे.

विशेष म्हणजे ज्यांच्या राजीनाम्याची गेल्या एक महिन्यांपासून मागणी करण्यात येत आहे असे मंत्री धनंजय मुंडे यांनी कराडच्या नावाची शिफारस केल्याचे उघड झाले आहे. पालकमंत्री असताना त्यांनी या समितीच्या अध्यक्षपदी वाल्मिकची शिफारस केली होती. कराड याच्यावर 14 गुन्हे असतानाही त्याला या योजनेचे पद बहाल करण्यात आले. त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड शरण आला आहे. वाल्मीक कराड सध्या नऊ दिवसांपासून सीआयडीच्या कोठडीत आहे. CID कडून आज त्याची व्हॉईस सॅम्पल घेण्याची शक्यता आहे. व्हाईस सॅम्पल जुळल्यानंतर वाल्मीक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना उलटला आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड शरण आला आहे. हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. घटनेचा तपास CID आणि SIT कडून सुरू आहे. तपासात स्थानिक गुन्हे शाखा देखील सहभागी आहे.

 

गुन्हे शाखेकडून सात आरोपींना अटक

जयराम माणिक चाटे, महेश सखाराम केदार, प्रतिक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!