सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर सर्वांना मान-सन्मान दिला. महाराजांनी त्यांच्या शत्रूस ठीदेखील कबर बांधली. आपल्या शत्रूसाठी असे आजवर कोणीही केले नाही. मात्र या कबरी भोवती मागील काळात काही लोकांनी अतिक्रमण केलं. हे अति क्रमण तोडून कबर खुली करायला हवी. त्यामुळे त्या कबरी मागचा इतिहास येणाऱ्या पिढीला कालू शकेल. अफझलखान मुस्लिम होता म्हणून ही कारवाई केली असा गैरसमज कोणीही करू नये, आपण लोकशाही असणाऱ्या देशात राहतो, त्यामुळे कायदा सर्वांनासाठी समान असतो. त्यामुळे या कारवाईला धार्मिक आणि राजकीय रंग देण चुकीचे आहे. असे मत खासदार उदयन राजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
किल्ले प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरी भोवती करण्यात आलेले अतिक्रमण वन, महसूल व पोलीस खात्याने संयुक्तपणे कारवाई करून जमीनदोस्त केले. या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जी गोष्ट कायद्याच्या विरोधात आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अनेक संघटना ही कबर पूर्णपणे हटवण्याची मागणी करत आहेत. मात्र तसे होऊ शकत नाही, कारण शिवाजी महाराजांनी काही विचार करूनच ही कबर बांधली असावी.
राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इंग्लंडमधील जगदंबा तलवार पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावर उदयनराजे म्हणाले की, जगदंबा तलवार भारतात यावीही प्रत्येकाची इच्छा आहे. ब्रिटिशांनी दुसऱ्या देशातून आणलेल्या वस्तू मोठं मन दाखवून त्या देशांना परत करायला हव्यात असे उदयनराजे भोसले यांनी संगितले.