ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शहांच्या वक्तव्यांचा फडशा आपण दसरा मेळाव्याला पाडू ; उद्धव ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापले असून दुसरीकडे नुकताच दसरा मेळावा आल्याने या मेळाव्यातून अनेक नेते आरोप प्रत्यारोपाच्या फैरी उडविणार आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.

गेली 2 अडीच वर्षे आम्ही न्याय मंदिराची दारं ठोठावत आहोत, हात दुखायला लागले. न्याय देवतेवर विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाही. मग आम्ही असे ठरवले की जगदंबेला साकडे घालायचे की तू तरी आता दार उघड. गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यांचा फडशा आपण दसरा मेळाव्याला पाडू असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही आता जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी जात आहोत, मला विश्वास आहे की ही सगळी तोतयागिरी चालली आहे. घटनाबाह्य सरकारचे घोटाळे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. आई जगदंबेला मनापासून हाक मारली की ती भक्ताच्या रक्षणासाठी धावून येते हे इतिहासात दिसले आहे, आणि पुढेही दिसेल.

असुरांचा संहार कराया मशाल हाती दे.. सतवरी भूवरी ये ग अंबे.. सतवरी भूवरी ये.., असे या गीताचे बोल आहेत.’विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे मशाल गीत लाँच केले आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे जे बोलायचे आहे ते बोलून घ्या, सौ सोनार की एक लोहार की, असे म्हणत शेवटी त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या परंपरेप्रमाणे दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर आपण भेटणार आहोतच. पण आज नवरात्री सुरू होत आहे, हा आपल्या जगदंबेचा उत्सव आहे. जे आसूर माजले होते त्यांचा वध करणाऱ्या आपल्या जगदंबेचा उत्सव सुरू होत आहे. आजची पत्रकार परिषद ही राजकीय नाही. राज्यात ती अराजकता माजली आहे, तिचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणे आपण जगदंबेसाठी तयार केले आहे. एकूणच राज्यामध्ये जी काही तोतया गिरी चाललली आहे. संत एकनाथ यांनी आरोळी मारली होती बाई दार उघड पण आज त्यांच्या नावाने तोतयागिरी करणारे खूप झाले तिचा नायनाट करण्यासाठी हे गाणे जगदंबे चरणी सादर करत आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!