ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दोन तास व्हाटस अॅप बंद, नेटकरी हैराण

मुंबई : डिजिटल माध्यमातील संवादाचं सर्वात मोठं माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हाटस अॅप मागील दीड तासहून अधिक काळ बंद पडल होता. व्हाटस अॅप बंद झाल्याने नेटकरी हैराण झाले होते. १२.३० ते २.३० असे दोन तास व्हाटस अॅप बंद होतं. अखेर काही मिनीटापूर्वी व्हाटस अपने आपला सेवा पुन्हा पूर्ववत केला आहे. अचानक व्हाटस अॅप बंद झाल्याने अनेक व्हाटस अॅप यूजर्सचा जीव मेटाकुटीला आला होता. अखेर व्हाटस अॅप सुरू होताच सगळ्या युजर्सचा जीव भांड्यात पडला आहे.

व्हॉट्सअॅपची सेवा मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक ठप्प झाली. मेसेज येणं आणि जाणं बंद झालं. सुरुवातीला हा व्हॉट्सॲपचा प्रॉब्लम असल्याचं कुणाच्याही लक्षात आलं नाही. आपल्या इंटरनेटचा किंवा नेटवर्कमध्ये काही तरी इश्यू असावा असं युजर्स समजत होते. इंटरनेटवर अन्य सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या, फक्त व्हॉट्सॲपच ठप्प झालं होतं. त्यामुळं युजर्स अक्षरश: सैरभैर झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!