ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात कॉंग्रेस स्वबळावर लढणार ? नेत्याचे वक्तव्य चर्चेत !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असतांना अशाच सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून देखील मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी सुरु असतानाच काँग्रेस नेत्याने केलेल्या विधानामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

288 विधानसभा मतदारसंघात आजपासून काँग्रेसच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु आहेत. पण काँग्रेसचा 288 मतदारसंघांसाठीचा प्लॅन तयार आहे, असा दावा काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी केला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग आहे. अशातच काँग्रेसकडून 288 जागांसाठी तयारी सुरु असल्याचं कळतं आहे. त्यामुळे काँग्रेस खरंच स्वबळावर लढणार की हे मित्रपक्षांवर दबावतंत्र आहे? हे येत्या काळात स्पष्ट होईल.
आजपासून वेगवेगळ्या मतदारसंघात आमचे काँग्रेसचे नेते जाणार आहेत. मुलाखती घेणार आहेत. इच्छुकांचे म्हणणे ऐक्याचे आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अहवाल द्याचे आहे. 288 मतदारसंघांचा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत. 288 मतदारसंघात आमचे उमेदवार तयार आहेत. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मुळखती घेणार आहोत. चाचपणी करतोय अहवाल करणार आहोत, असं वंजारी यांनी सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!