मेष : आज सकारात्मक दृष्टीकोनासाठी काहीवेळ अध्यात्मिक कार्यात व्यतित करा. ध्येयपूर्तीसाठी केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. कोणतीही अशुभ सूचना मिळाल्यानेही तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायिक कामे सामान्य राहतील.
वृषभ : सकारात्मक कृती करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढेल. तुमच्या प्रतिभेला चालना मिळेल. भविष्यात उत्पन्नाचे साधनही मिळू शकते. कुटुंबातील सदस्याच्या प्रकृतीविषयी चिंता जाणवेल. वादविवाद टाळा. व्यवसायाशी निगडीत कामात अधिक मेहनत करावी लागेल.
मिथुन : : विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रतिभेला चालना मिळेल. मालमत्तेसंबंधी वाद मिटला जाईल. अनावश्यक खर्चात कपात करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. घरातील वातावरण आनंददायी राहिल.
कर्क : कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता तुमची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जीवनशैलीतील बदल सकारात्मक परिणाम देतील. महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्या. पोटविकाराचा त्रास होण्याची शक्यता.
सिंह : आज प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही संयम राखाल. स्वतःला रचनात्मक कार्यात गुंतवून ठेवाल. व्यवसायातील जोखमीच्या कामांचा पुनर्विचार करा. पती-पत्नीमध्ये वाद वाढू शकतात. आरोग्य चांगले राहिल.
कन्या : आज कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करण्यापासून दिलासा मिळेल. वस्तुस्थिती जाणून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. मानसिक शांततेसाठी ध्यान करा. वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
तूळ : रखडलेल्या कामांना गती मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. गरजूला मदत केल्याने मानसिक समाधान लाभेल. पती-पत्नी योग्य सामंजस्य राखतील. पोटाशी संबंधित समस्या जाणवतील.
वृश्चिक : आज घरातील ज्येष्ठांचा स्नेह आणि आशीर्वाद लाभेल. काळ थोडा प्रतिकूल आहे. कामाचा अतिरिक्त ताण घेवू नका. प्रेमसंबंधांना कौटुंबिक मान्यता मिळाल्याने मन प्रसन्न राहू शकते. आरोग्य चांगले राहील.
धनु : आर्थिक बाबतीत तुम्ही योग्य आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. अनेक कामांमध्ये नशीब तुमची साथ देईल. दिवसभराच्या व्यस्ततेतूनही कुटुंबासाठी वेळ काढाल. आरोग्य चांगले राहिल.
मकर : खूप दिवसांनी एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन अधिक प्रसन्न होईल. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष एकाग्र कराल. जवळच्या नातेवाईकाची समस्या सोडवण्यातही तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकता. कुटुंबात तुमची उपस्थिती सर्वांना आनंद देऊ शकते. जुना आजार्याकडे दुर्लक्ष करु नका.
कुंभ : कौटुंबिक मतभेद चर्चा करून सोडवले जातील. तुमच्या कामांचे कौतुकही होईल आणि लोकप्रियतेचा आलेखही वाढेल. व्यवसायात कोणताही ठोस निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागेल. वाईट संगत टाळा.
मीन : प्रचंड काम असूनही तुम्ही कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसोबत वेळ व्यतित कराल. भावनेऐवजी व्यवहारीक दृष्टीकोन ठेवा. घरातील मोठ्यांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. पती-पत्नीमध्ये काही वाद होण्याची शक्यता आहे.