जनतेचे प्रेम कधी विसरणार नाही : आ.कल्याणशेट्टी !
वाढदिवसानिमित्त आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवस अक्कलकोटमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. हन्नूर रोडवरील कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास शहर, तालुका आणि जिल्ह्यातील असंख्य भाजप नेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित राहून या उत्सवाला भव्यता प्राप्त करून दिली.
सोहळ्याची सुरुवात होताच विविध मान्यवरांचे आगमन झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. म.नि.प्र. बसवलिंग महास्वामी, आमदार देवेंद्र कोठे, मोहोळचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील, वळसंग सूतगिरणीचे राजशेखर शिवदारे, सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने, उपसभापती सुनील कळके, संचालक सुरेश हसापुरे, केदार उंबरजे, सुरेश पाटील, श्रीशैल बनशेट्टी, गुरुशांत धुत्तरगावकर, बिज्जू प्रधाने, प्रा. अशोक निंबर्गी, दिलीप सिद्धे, शहाजी पवार, सुशील क्षीरसागर, श्रीशैल नरोळे, सुभाष पाटोळे, उदय पाटील, वैभव बरबडे, अप्पू बिराजदार आदी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन आमदारांचा गौरव केला.
अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले, वटवृक्ष देवस्थानचे महेश इंगळे, भाजप मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, इंद्रजित पवार, रामचंद्र होनराव, नन्नूभाई कोरबू, आनंद तानवडे, महेश हिंडोळे, दयानंद बिडवे, प्रभाकर मजगे,शिवशरण जोजन, जलील बागवान, रामचंद्र अरवत, सुरेश गड्डी, सुरेश नागुर, शिवयोगी स्वामी, अतुल मेळकुंदे, उमेश पाटील, अविनाश मडीखांबे, महेश पाटील, प्रशांत लोकापुरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, अमर पाटील, सुधाताई अळळीमोरे, विपुल दोशी,नाविद डांगे, मुबारक शेख, शिवकुमार कापसे, नागराज कुंभार, कांतू धनशेट्टी, सातलींग परमशेट्टी, अतुल कोकाटे, विक्रम शिंदे, मल्लिकार्जुन आळगी, विलास कोरे,गजानन पाटील,राजशेखर हिप्परगी, अरविंद ममनाबाद, रामचंद्र बिराजदार,
बसवराज हौदे, दयानंद बिडवे, दत्ताकुमार साखरे, महादेव कोगनुरे, सागर तेली, डॉ. शरणू काळे, डॉ. गणेश थिटे, सिद्धाराम टाके,अभि लोकापुरे,परमेश्वर यादवाड, महादेव माने,सुरेश झळकी यांनी भेटून शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय सोशल मीडिया व भ्रमणध्वनीवरून देखील राज्यातील अनेक विधानसभेतील सहकारी,धर्म गुरूंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात मल्लिकार्जुन मंदिर पंच कमिटी, कोष्टी समाज, व्यापारी महासंघ, छत्रपती श्री संभाजी महाराज सोहळा समिती, शिव बंसव प्रतिष्ठान, सोन्या मारुती प्रतिष्ठान, साई समर्थ प्रतिष्ठान, श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सव मंडळ, नागनाथ नवरात्र महोत्सव, राजे प्रतिष्ठान, पत्रकार संघटना, रिद्धी सिद्धी गणेश मंदिर समिती, भारत गल्ली नवरात्र महोत्सव यांसारख्या नामांकित सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संस्थांचा सहभाग विशेषत्वाने उठून दिसत होता. या सर्व मंडळांनी आमदारांना शुभेच्छा देत सन्मान व्यक्त केला.
अनेक मान्यवरांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुका विकासाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत असल्याचे गौरवोद्गार काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने महायुती सरकारच्या माध्यमातून अक्कलकोटमधील विविध प्रकल्पांना गती मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, मल्लिनाथ कल्याणशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी,सागर कल्याणशेट्टी व परिवाराच्या वतीने करण्यात आले. प्रारंभी सकाळी हुमनाबाद येथे कुलदैवत विरभद्रेश्वर देवस्थानाचे दर्शन घेऊन वाढदिवसाचा
प्रारंभ करण्यात आला होता.
दिवसभर भारतीय जनता पक्ष कार्यालय तसेच कल्याणशेट्टी महाविद्यालयात शुभेच्छुकांची गर्दी ओसंडून वाहत होती. प्रत्येक गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध संस्था-समित्यांनी आमदारांचा सत्कार करण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या अखेरीस अनेक मान्यवर, संस्था आणि नागरिकांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि आपुलकीची भावना ओतप्रोत जाणवत होती.
अक्कलकोट तालुक्यातील जनतेने माझ्यावर दाखवलेला प्रेम आणि विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक मान्यवर आपल्यात सामील झाले. आज वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कधीही विसरणार नाही. या स्नेहबळावर मी आणखी जोमाने कार्य या सत्काराने आणि आशीर्वादाने मी भारावलो आहे,असे भावनिक शब्द आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
दरम्यान अक्कलकोटमध्ये साजरा झालेला हा वाढदिवस उत्सव केवळ अभिनंदनाचा कार्यक्रम नसून सामाजिक, राजकीय आणि विकासाच्या एकात्मतेचे प्रतीक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.