ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रशांत कोरटकर शरण येणार का?  पोलीस मागावर !

कोल्हापूर : वृत्तसंस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजित सामंत यांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूरच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळला आहे. अंतरिम जामिनाचा अर्जच फेटाळण्यात आल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर दुसरीकडे अटकपूर्व जामिनासाठी प्रशांत कोरटकर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रशांत कोरटकर हा गेल्या 25 फेब्रुवारी पासून फरार असून अटकपूर्व जमीन मंजूर असतांना देखील प्रशांत कोरटकर आपली बाजू मांडायला व आवाजाचे नमुने द्यायला पोलिसांपुढे पुढे आला नाही हे विशेष आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप प्रशांत कोरटकरवर आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल असून अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांचे दोन पथक प्रशांत कोरटकरच्या मागावर आहेत. कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे. मात्र, अटकपूर्व जामीन फेटाळला शिवाय सात दिवसांची मुदतवाढ देखील नाकारली असं असतानाही प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण आलेला नाही. त्यामुळे अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group