ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जागतिक अपुऱ्या दिवसाच्या बाळंतपणाचा दिवस

सोलापूर : दिनांक 17 नोव्हेंबर दिवस जगभर जागतिक अपुऱ्या दिवसाच्या बाळंतपणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. खरंतर अपुऱ्या दिवसाचे बाळंतपण हे बाळासाठी विविध समस्यांना आमंत्रण ठरू शकते. आपल्या देशामध्ये जवळजवळ दर दहा बाळंतपणा मागे एक बाळंतपण अपुऱ्या दिवसांच्या असते. यामुळे कित्येक बालकांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. शिवाय जी बाळे जगतील त्यांच्यामध्ये मेंदूचे किंवा इतर अवयवांचे आजार संभवतात. यावेळेस एक वेगळे ब्रीदवाक्य घेऊन हा दिवस जगभर साजरा केला गेला. ते म्हणजे “आईची मिठी अपुऱ्या दिवसाच्या बालकाला वरदान”. (Parents Embrace : A Powerful Therapy). या अंतर्गत आपल्या सोलापुरात हा दिवस इंडियन असोसिएशन ऑफ पीडयाट्रिक्स तर्फे सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. मिलिंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेन हॉस्पिटलमध्ये साजरा केला गेला.

यासाठी डॉ. प्रतिभा पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळेस आय ए पी च्या अध्यक्षा डॉ. मनीषा चव्हाण व इतर बालरोग तज्ञ डॉ. आबेद अली डॉ. अण्णासाहेब लोखंडे, स्पॅन हॉस्पिटलचा कर्मचारी वृंद, नर्सेस व पेशंट्स उपस्थित होते. उपस्थित महिलांना अपुऱ्या दिवसाच्या बाळंतपणाची व बाळाची काळजी कशी घ्यावी याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर असे बाळंतपण कसे टाळावे याच्यावरील मार्गदर्शन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!