---Advertisement---

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून नवीन महसूल भवन इमारतीची पाहणी

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.18  : येथील नियोजन भवन शेजारी  बांधण्यात आलेल्या नवीन महसूल भवनची पाहणी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक संजय माळी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नवीन महसूल इमारत अत्याधुनिक व सर्व सोई-सुविधांनी युक्त असून जिल्हाधिकारी कार्यालयासह अधिनस्त प्रमुख कार्यालये या नवीन महसूल भवनात लवकरच सुरू होणार आहेत. या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आहे.

यावेळी महसूल भवनातील सर्व दालनांची, अधिनस्त कार्यालये तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पार्किंग व्यवस्था, कर्मचारी बैठक व्यवस्था, पाणी व्यवस्था, बैठक सभागृह आदींची पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांनी पाहणी केली.

नवीन महसूल भवनमध्ये उपलब्ध सुविधा तसेच या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांनी आवश्यक सूचना दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!