व्वा ; काय परिसर ! अक्कलकोटमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘डी ग्रीन व्हिलेज’ रिसॉर्टचा उद्घाटन सोहळा
मारुती बावडे
अक्कलकोट ,दि.२६ : अक्कलकोट शहरात नव्याने निर्माण झालेल्या सोलापूर रोडवरील भव्य दिव्य ‘डी ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट’ चा उद्घाटन सोहळा हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. अतिशय देखण्या स्वरूपात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याने नागरिकांचे मन भारावून गेले. अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागात प्रथमच अशा स्वरूपाचा रिसॉर्ट झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पाहायला मिळाले.
मुख्य प्रवेशद्वार,लव अक्कलकोटचे सेल्फी पॉइंट, बिल्व प्युअर व्हेज रेस्टॉरंट, वटवृक्ष भव्य ओपन लॉन व गार्डन, भव्य एसी हॉल, एसी रूम, २४ तास गरम पाण्याची सोय, एक्झिक्युटीव्ह रूम्स, एसी कॉटेज रूम्स,दोन स्विमिंग पूलसह पुरुष आणि महिला व लहान मुलांसाठी वेगवेगळी सोय अशा अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त असलेल्या डी ग्रीन व्हिलेज रिसॉर्टची अक्कलकोटसह भाविकांना उत्सुकता होती. हे रिसॉर्ट अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर ते खुले झाल्याने चांगली सोय झाली असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उद्घाटनाप्रसंगी बोलताना सांगितले.
प्रारंभी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी व अन्य मान्यवरांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी, म.नि. प्र. अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी, म.नि.प्र प्रभूशांत महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले. यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांच्यासह स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अमोलराजे भोसले, वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, बँक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर दत्तात्रय कावेरी, उपकार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे, नगरसेवक महेश हिंडोळे, भाजपचे शहराध्यक्ष शिवशरण जोजन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, दत्तकुमार साखरे, स्वामी समर्थ प्रेस असोसिएशनचे बाबा निंबाळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अक्कलकोट शहरापासून अतिशय कमी अंतरावर सुसज्ज असे रिसॉर्ट उभे राहिल्याने अक्कलकोटकरांची मोठी सोय झाली. आता रिसॉर्टसाठी कोकणात किंवा अन्य भागात जायची गरज नाही आपल्या भागामध्ये सुद्धा याची सोय झाली आहे नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित महास्वामीजी यांनी नागरिकांनी केले.
यावेळी रिसॉर्टकडून स्वामीनाथ हिप्परगी, विलास कोरे,गजानन पाटील,राजशेखर हिप्परगी,दिनेश पटेल, ओंकार हिप्परगी, चनमल पाटील, दर्शन पाटील, प्रथमेश हिप्परगी, प्रणव हिप्परगी, पियुष पटेल, जितेन पटेल, ओंकार कोरे, हिम्मत पटेल, दत्तात्रय पाटील आदींनी आलेल्या मान्यवर व नागरिकांचे स्वागत केले. यावेळी महिलांची संख्या प्रचंड होती.
सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या रिसॉर्टसाठी आर्किटेक्ट म्हणून वीरेंद्र बोलाबत्तीन,सिव्हिल इंजिनियर म्हणून किरण पाटील, साईट इंजिनिअरिंग म्हणून राजकुमार कुंभार यांनी काम पाहिले. रोटरीचे माजी अध्यक्ष अशोक येणेगुरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले. प्रारंभी प्रकल्पाविषयी माहिती इंजिनिअर किरण पाटील यांनी दिली. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून डी ग्रीन व्हिलेज रिसॉर्टच्या टिमला शुभेच्छा दिल्या.