ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील ‘या’ ठिकाणी येलो अलर्ट जारी !

मुंबई : वृत्तसंस्था

यंदा राज्यभर मान्सूनपूर्व पावसाने राज्यात हजेरी लावलेली पाहायला मिळालं होतं. मात्र पावसाने सर्व ठिकाणी हजेरी लावलेली दिसली नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. पूर्व विदर्भ आणि नंदूरबारमध्ये मान्सून अद्याप दाखल झालेला नाही. अशातच पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसराळीकर यांनी पावसबाबत अपडेट दिली असून शेतकऱ्यांनाही कृषी विभागाचा सल्ला घेऊन पेरणी करावी असं आवाहन केलं आहे.

पुढील तीन-चार दिवस विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसहर पाऊस पडतोय. मात्र मान्सून पूर्णपणे राज्यात सर्व दूर दाखल झालेला नाही. नंदुरबार, पूर्व विदर्भात अजून मान्सूनची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करण्याचा आवाहन करण्यात आलय. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तसा पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे. तरीही मान्सून सर्वदूर महाराष्ट्रात आणखी पोहोचला नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, आता खरीप हंगामातील पिकांसाठी पेरणी महत्त्वाची आहे. कारण जर पेरणी केली आणि पावसान दडी मारली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट असणार आहे. त्यामुळे होसाळीकर यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन शेतकऱ्यांना पेरणी करावी असं म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!