ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये योगाचे धडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची उपस्थिती

अक्कलकोट,दि.२१ : सदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाला योग हा आवश्यकच आहे. आणि तो प्रत्येकाने दररोज केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून विवेकानंद प्रतिष्ठान व पतंजली योग समिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल मंदिर,पटांगण एवन चौक येथे योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात योगाचे महत्व सांगून उपस्थितांना त्याचे धडे देण्यात आले.

सकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडला.योग शिक्षक मोहन कुंभार यांच्या हस्ते श्री. स्वामी समर्थ प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात
आली.व्यासपीठावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, अविनाश मडीखांबे, प्रभाकर मजगे,दयानंद बिडवे, मल्लिकार्जुन मसुती, विलास कोरे उपस्थित होते.

योग प्रशिक्षक मोहन कुंभार यांनी कोरोना काळात योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक करून सदृढ आराेग्यसाठी दैनंदिन जीवनात
प्रत्येकाने योगा करावा,असे सांगितले.

योग शिबिरास राजकुमार उंबराणीकर, विजयकुमार पाटील, विश्वनाथ देवरमनी, लक्ष्मण पाटील, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, राजकुमार झिंगाडे, मल्लिकार्जुन अ‌ाळगी, ऋषी लोणारी,
अंकुश चौगुले, आतिश पवार, डाॅ.सतिश बिराजदार, चंद्रकांत दसले यांची
उपस्थित होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!