ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तुम्हाला वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी पूर्ण पाठिंबा मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.२२ नोव्हेंबर २०२५

मेष राशी
व्यवसायाचा विस्तार होईल, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे, आयुष्यात किरकोळ चढ-उतार होतील. तुम्हाला वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही प्रॉपर्टीबाबत महत्त्वाचे निर्णय घ्याल.

वृषभ राशी
गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेल्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात, परंतु परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

मिथुन राशी
अनपेक्षित खर्चांमुळे आज आर्थिक बोजा वाढेल. आज ऑफिसमध्ये चांगला दिवस जाणार नाही. अस्वस्थ वाटेल. कोणी खास व्यक्ती आज तुमच्यासमोर विश्वासघात करू शकते, सावध रहा.

कर्क राशी
काम आणि कुटुंबाचा ताळमेळ साधाताना त्रेधातिरपीट उडू शकते, दमछाक होईल. मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तुमच्यावर अवलंबून राहतील. हमखास यश मिळेल.

सिंह राशी
आज नशीब तुमच्या बाजूने आहे; कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन व्यवसाय संधींचा शोध घेतला जाऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी, चांगली ऑफर मिळेल.

कन्या राशी
आज, तुमच्या परीक्षेचे निकाल लागू शकतात आणि चांगले मार्क मिळतील. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करू नका; तुम्हाला बदलीची सूचना मिळू शकते.

तुळ राशी
आज, चांगली बातमी ऐकून उत्साहित व्हाल. एक फायदेशीर योजना आखाल, व्यवसायाचा विस्तार कराल. आवडत्या गोष्टीचा अभ्यास करण्यात वेळ जाईल. तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या वक्तृत्व कौशल्यामुळे अनेक यश मिळतील. बहुप्रतिक्षित काम पुढे जाईल.

वृश्चिक राशी
मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. आज कोणत्यातरी सामाजिक धर्मादाय कामात स्वतःला गुंतवा. प्रेम जीवनातील आजचा दिवस सुंदर असेल.

धनु राशी
तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. पैसा मिळेल, पण खर्चही वाढतील.

मकर राशी
आज व्यवसायातील समस्या सोडवल्या जातील. तुम्ही महत्त्वाच्या लोकांशी संपर्क साधाल. आज कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. या राशीखाली जन्मलेली मुले त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील.

कुंभ राशी
कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. घरगुती वस्तू वाढतील. तुमचा सामाजिक दर्जा उंचावेल. व्यवसायात तुम्हाला लक्षणीय नफा मिळू शकेल.

मीन राशी
आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळवण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता असेल. पैसा, यश मिळेल पण वादविवादांपासून दूर राहा, भांडण टाळा. फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!