आजचे राशिभविष्य दि ६ मे २०२४
मेष : चुकीच्या गोष्टी करू नका. परदेश प्रवासास जाण्याची इच्छा असल्यास आज त्याचे बेत अखणी मनात येईल. चुकीच्या गोष्टी करू नका. विनाकारण त्याचे फळ आपल्याला भोगावे लागेल. स्वामी समर्थांची उपासना फलदायी ठरेल.
वृषभ : चांगल्या गोष्टी कानावर येतील
व्यवहाराचे आडाखे पक्के बनतील. संतती निगडित काही चांगल्या गोष्टी कानावर येतील. तब्येत मात्र जपावी.
मिथुन : ऑफिसात दिवस चांगला जाईल
पुस्तक खरेदी, वैचारिक चर्चा, ऑफिसमधील सहकारी यांबरोबर आजचा दिवस वेगळ्या पद्धतीने अनुचारला जाईल. “करावे तसे भरावे” या उक्तीप्रमाणे सर्व अलबेल होईल.
कर्क : योग्य ठिकाणी पैसा खर्च होईल
भावना आणि भावनांचा सागर आज ओतप्रोत दाटेल. देवधर्म, अध्यात्म याविषयी मान्यवरांशी चर्चेचा दिवस. योग्य ठिकाणी पैसा खर्च होईल. आणि त्याचा आनंद होईल.
सिंह : सतर्कतेने पावले उचला
विनाकारण कोणीतरी आपल्याला सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. पण आज तुम्ही अलर्ट रहा. सतर्कतेने पावले उचला. उगाचच धावपळ टाळा.
कन्या : दिवस मनासारखा राहील
कोर्ट कचेरी, मोठे व्यवहार, व्यवसायाच्या गोष्टी याकडे विशेषत्वाने महत्त्व द्या. लक्ष द्या. कुठे योग्य आणि अयोग्य समतोल साधून पावले उचलल्यास दिवस मनासारखा राहील.
तूळ : विचाराने मन सैरभैर होईल
उगाचच सुरू असणारी मनाची घालमेल आज टोकाच्या निर्णयापर्यंत जाईल. मानसिकता जपा. उगाचच नकारात्मक विचाराने मन सैरभैर होईल. त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढतील.
वृश्चिक : कठोर निर्णय घेणे टाळा
तशी भावनिक असणारी आपली रास. आज काही गोष्टी संतती बाबतीत विचार करण्यास लावणाऱ्या ठरतील. कोणत्याही गोष्टींसाठी कठोर निर्णय घेण्याचे टाळा.
धनु : पाहुण्यांची सरबराई राहील
पाहुण्यांची सरबराई राहील. तरी सुद्धा केलेल्या कामात यश मिळेलच असे नाही. विनाकारण आपल्या मागे बोलणारे लोक यामुळे त्रास होईल.
मकर : दिवस आनंदी राहील
लेखनाची आवड असेल तर आज नवीन गोष्टी सुचून त्यामध्ये वेगळी सुरुवात होईल. पुस्तक वाचन, लेखन आणि इतर गोष्टी मनासारख्या केल्यामुळे दिवस आनंदी राहील.
कुंभ : कुटुंबीयांसाठी वेळ द्या
उगाचच काहीतरी नवीन खावे – प्यावे एकत्र उठावे – बसावे असे भाव मनात राहतील. आणि म्हणून कुटुंबीयांसाठी वेळ द्या. तो नक्कीच सत्कारणी लागेल.
मीन : काहीतरी वेगळे करण्याची ऊर्जा मिळेल
माशा प्रमाणे खोल सरोवरासारखी, समतोल व भावनेनं ओथंबलेली आपली रास. काहीतरी वेगळे करण्याची ऊर्जा आज राहणार आहे. आणि त्यामुळे “प्रेमाने जग जिंकता येते” हे आज समजून जाईल.