---Advertisement---

अक्कलकोटमध्ये डि.के सुपर लीग राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

On: December 18, 2020 10:06 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अविराज सिद्धे मित्र मंडळाकडून डि. के सुपर लीग राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महापालिकेचे उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.अशा स्पर्धांमुळे अक्कलकोट शहरासह ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल, अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा या वारंवार झाल्या पाहिजेत आणि त्या होण्यासाठी आपण देखील सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत,अशी अपेक्षा दिलीप कोल्हे यांनी व्यक्त केली.पहिला सामना रायगड रॉयल्स विरुद्ध विनर्स वॉरियर्समध्ये झाला. सलामीच्या सामन्यात विनर्स वॉरियर्सने हा सामना जिंकला.

पहिल्या दिवशी दोन सामने पार पडले. ही स्पर्धा २६ डिसेंबरपर्यंत चालणार असून या स्पर्धेमध्ये दहा संघ सहभागी झाल्याची माहिती संयोजक अविराज सिद्धे यांनी दिली. पहिले बक्षीस ५१ हजार रुपये रोख असून त्यासोबत राष्ट्रवादी चषक दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार,शिवराज स्वामी, राम जाधव,इस्माईल फुलारी, शीतल फुटाणे, शंकर पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा नेते अविराज सिद्धे, सुहास सुरवसे,रोहित मडीखांबे, प्रभू देवर, रशीद खिस्तके, दर्शन चव्हाण, सोनू सुरवसे, शकील मुजावर, झाकिर तांबोळी,श्रीशैल चितली, संजय जमादार, पिंटू राठोड, सिद्धाराम पुजारी, शिवशरण सद्दलगी,शिवकुमार मेनशेट्टी, अनिल माने आदी परिश्रम घेत आहेत.

पंच म्हणून अमोल गोटकर,सतिश हिळळी, अंकुश पवार हे काम पाहत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!