---Advertisement---

अक्कलकोट तालुका बंदला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.१९ : सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या २१ सप्टेंबरच्या अक्कलकोट
बंदला सर्व पक्षीय पाठिंबा जाहीर करण्यात आला.

सर्जेराव जाधव सभागृहात झालेल्या सभेत प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले आणि बंद करण्यामागची भूमिका विषद केली.यावेळी तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड,आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रासप जिल्हा अध्यक्ष सुनील बंडगर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रहार संघटनेचे अध्यक्ष अमर शिरसाठ, मुस्लिम समाज अध्यक्ष एजाज मुतवल्ली, लहुजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष वसंत देडे,वडार समाजाचे अध्यक्ष चौगुले, प्रा.राहूल रुही,शहर भाजपाध्यक्ष शिवशरण जोजन, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, नगरसेवक महेश हिंडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे , माळी महासंघातर्फे सिध्देश्वर माळी यांनी मनोगत व्यक्त केले आणि बंदला पाठिंबा जाहीर केला.यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष महेश इंगळे, शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल राजे भोसले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोज निकम, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण घाडगे,प्रहारचे विजय माने, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी नगरसेवक सद्दाम शेरिकर, संभाजी ब्रिगेडचे सुरेश कदम, मनोज गंगणे, नगरसेवक नागराज कुंभार, बाळासाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्य राजकुमार बंदीछोडे, नितीन शिंदे,अरुण जाधव, माळी समाज अध्यक्ष अप्पू पराणे, मंगेश फुटाणे, धनंजय गायकवाड, राहूल निंबाळकर,राजा नवले शितल फुटाणे, यांच्यासह शेकडो मराठा युवक उपस्थित होते.सभेचे सूत्र संचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर आभार शहर शिवसेना प्रमुख योगेश पवार यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!