ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात मताधिक्य कोणाला ? पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालाविषयी उत्सुकता

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.२ : अतिशय चुरशीने झालेल्या
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातून मताधिक्य कोणाला या विषयी जोरदार चर्चा सुरू आहे.भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच
असून याविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.भाजपने आम्हीच जिंकण्याचा दावा केला आहे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी विजयाचा दावा केला आहे.अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी शांततेत मतदान पार पडले होते. शिक्षकसाठी ७७.९६ टक्के तर पदवीधरसाठी ६६.४९ टक्के मतदान झाले होते.पूर्वी अशा पद्धतीचा हायटेक प्रचार झाला नव्हता.यावेळी पहिल्यांदाच इतकी मोठी प्रचार यंत्रणा राबवण्यात आली होती.सर्वच मतदान केंद्रावर चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिक्षक मतदारसंघांमध्ये ९०३ पैकी ७०४ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला तर पदवीधरमध्ये २ हजार ३२७ मतदारांपैकी १ हजार ५४८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.आता हा मतदार नेमका कुणाच्या बाजूने जाणार
हे पाहावे लागेल.प्रचारासाठी भाजपकडून स्वतः उमेदवार तसेच खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख,आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सूत्रे हाती घेत निवडणूक चुरशीची केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार रोहित पवार, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख आदींनी प्रयत्न केले होते. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी खूप
ऍक्टिव्ह झाले होते.भाजपच्या नेतेमंडळींनी ही निवडणूक चुरशीची केली होती.अक्कलकोटसह संपूर्ण
पुणे विभागामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे मतदान पार पडले. मोठ्या प्रमाणात मतदान होईल की नाही याबाबत साशंकता होती मात्र अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाले,त्यामुळे दोन्ही पक्षाने विजयाचा दावा केला आहे.
सध्या शहर आणि तालुक्यात या निकालाचीच सर्वांना
उत्सुकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!