---Advertisement---

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर गुन्हा दाखल

Follow Us:
---Advertisement---

 

पंढरपूर, दि.२ : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मतदारांवर प्रभाव पाडले म्हणून पंढरपूर शहर
पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.आचार संहितेचा भंग झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.पंढरपूर येथील कवठेकर शाळा येथील मतदान केंद्र क्र.१८९ मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.साधारण दुपारी साडेतीनच्या सुमारास खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी या केंद्राला
भेट दिल्याची माहिती मिळत आहे.यासंदर्भातील फिर्याद पंढरपूरच्या मुख्याधिकार्‍यांनी पोलिसात दिली आहे.त्यानुसार
हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय गाडेकर करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!