---Advertisement---

अक्कलकोट – दुधनी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रथमेश म्हेत्रे यांची बिनविरोध निवड

Follow Us:
---Advertisement---

 

दुधनी दि. २८ : दुधनी विविध कार्यकारी सोसायटीच्या नुतन चेअरमनपदी प्रथमेश शंकर म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे त्यांच्या जागेवर स्व. ज्येष्ठ नेते सातलींगप्पा म्हेत्रे यांचे नातू व अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव म्हेत्रे यांचे चिरंजीव प्रथमेश म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री एस.व्ही. कुंभार, संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री गुरुशांत ढंगे, संचालक श्री शंकर म्हेत्रे, सुभाष परमशेट्टी, सिद्धाराम येगदी, शिवानंद हौदे, गुरूशांत मगी, देसु राठोड , मलकण्णा गद्दी, शांताबाई यंकंची, संस्थेचे सचिव विजयकुमार हडलगी, संजय म्हेत्रे, रतीश कोटनूर आणि काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!