अक्कलकोट,दि.१६ : अक्कलकोट येथे
श्री गणेश जयंती निमित्त प्राचीन श्री गणेश मंदिरावर श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते कळसारोहण करण्यात आले.
अक्कलकोट संस्थांच्या प्राचीन गणेश पंचायतन मंदिरात गणेश याग यज्ञ करण्यात आला.यावेळी श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चना करून कळसारोहण करण्यात आले.याप्रसंगी जयप्रभादेवी जयाजीराजे भोसले, वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे, फत्तेसिंह शिक्षण संस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, श्रीनिवास इंगळे, उल्हास निंबाळकर,रोहन राजेशिर्के, राहूल निंबाळकर,उदय जाधव,राजेश निंबाळकर,जगताप,बावणे
आदी उपस्थित होते.