---Advertisement---

अक्कलकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आर.आर पाटील यांना अभिवादन

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१६ : लोकनेते स्व.आर.आर पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात अककलकोट शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सोलापूर जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे यांनी आबा राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री असताना राज्याच्या हितार्थ केलेल्या भरीव कामावर प्रकाश टाकला.डान्स बार बंदी , मोठ्या प्रमाणात पोलीस भरती , पारदर्शकता ,स्वछ प्रतिमा आणि सामान्य व्यक्तिमत्व अशा अष्टपैलू बाबीवर विचार मांडला. तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी आबानी राजकारणात सुरुवात कशी केली , आणि सामान्य जीवनातून आपला राजकीय ठसा कसा उमटविला.पवार यांनी या कोहिनूर हिऱ्याची ओळख महाराष्ट्राला दाखविली .नेते म्हंटले की डोळया समोर आलिशान गाड्या, संपत्ती आणि अंहभाव दिसतो. परंतु आबा या उलट होते. माझ्या राज्यातील सामान्य जनतेची प्रगती कशी होते या कडे लक्ष देणारे आबा एकमेव नेते होते. आणि असा नेता भविष्यात सुध्दा होणार नाही,असे मत सुरेशचंद्र सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, जिल्हा पक्ष संघटक विक्रांत पिसे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष इस्माईल फुलारी, शहर उपाध्यक्ष प्रथमेश पवार ,राम जाधव उपस्थिती होते. आभार इस्माईल फुलारी यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!