---Advertisement---

अखेर महेश कोठेंचा राष्ट्रवादीत प्रवेश ; शरद पवारांची माहिती

On: January 8, 2021 6:10 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. महेश कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले. यासंदर्भांत स्वतः पवारांनी ट्विट केले आहे

महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कोठे यांचा आज शुक्रवार (8 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार होता. मात्र शिवसेनेच्या सूचनेनंतर महेश कोठे यांचा पक्षप्रवेश थांबण्यात आला होता.

त्यानंतर दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मिटिंग झाली. त्यानंतर मोजक्या काही लोकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सुद्धा महेश कोठे यांचा प्रवेश झाला नाही. त्यामुळे याची चर्चा महापालिका वर्तुळात आणि शिवसेनेत रंगली होती. पण या चर्चेला आता विराम मिळाला आहे. कारण दस्तुरखुद्द शरद पवार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांचा पक्ष प्रवेश झाल्याची ची माहिती देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!