---Advertisement---

अजितदादा…कुठेतरी लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिली आहे का? निलेश राणेंचा टोला

On: December 5, 2020 1:02 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई – राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे.  यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत भाजपवर निशाना साधला होता.

वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय हे या निकालांवरुन स्पष्ट झालं आहे,” असं अजित पवार म्हणाले होते.  यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

“वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?,” असं म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांवर निशाणा साधला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!