ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मंगळवारी अक्कलकोट दौर्‍यावर ?

 

अक्कलकोट, दि.१२ : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
यात अक्कलकोट तालुक्याची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सोलापूरसह संपूर्ण राज्यभरात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टी भागाची पाहण्यासाठी तीन पथके
पाठवणार आहे.यातील एक पथक औरंगाबाद, उस्मानाबाद येथील स्थितीची पाहणी करून सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहे. अतिवृष्टीची सर्वाधिक झळ उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक बसली आहे.यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्याच भागामध्ये आता केंद्राचे पथक जाऊन नुकसानीसंदर्भात अहवाल सादर करणार आहे.मंगळवारी हे पथक अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहे.याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!