---Advertisement---

भारत भालकेंच्या आठवणीत शरद पवार झाले भावुक, म्हणाले

On: December 18, 2020 6:20 PM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी व भालकेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंढरपूरचा दौरा केला. यावेळी ते भारत नानांच्या आठवणीत भावुक झाल्याचं दिसून आलं. ‘आमदार भालके यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे . त्यांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं आहे,’ अशी खंत पवारांनी यावेळी व्यक्त केली.

 

‘काही गोष्टी तुमच्या आमच्या हातात नसतात. पंढरपूरच्या विकासासाठी भारत नानांनी मोठी धडपड केली. भारत नाना जरी आज आपल्यात राहिले नाहीत तरी त्यांचे कर्तृत्व, त्यांची माणुसकीची भावना आणि विभागाच्या विकासासाठी त्यांना असलेला ध्यास याचा विसर आपल्याला कधीही पडणार नाही.’ असं ते म्हणाले.

 

‘संकटं येतात पण त्या संकटांना धैर्याने मात करावी लागते, संकटं आहेत, पण जीवाभावाचा आपला आधार गेला. आधार गेला त्याचा दु:ख आहे. नानांनी या क्षेत्राच्या विकासासाठी मोठी मोलाची कामगिरी केली. त्याची दखल आपण सर्वांनी घेतली आहे. त्यांच्यानंतर या विभागासाठी जर कोणी काही केलं असेल तर त्यामध्ये भारत नानांचं नाव प्रकर्शाने घेतलं जाईल.’ असे उद्गार देखील त्यांनी काढले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!