---Advertisement---

अबब..! तब्बल १२५ फुटी आणि साडे सहा हजार कार्यकर्त्यांचे फोटो असलेला ‘बॅनर’

On: December 18, 2020 2:22 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे | हौशी कार्यकर्ते आपण नेहमीच पाहतो. अशाच काही हौशी कार्यकर्त्यांनी केलेल्या पोस्टर बाजीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात करण्यात आलेल्या भन्नाट बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने तब्बल १२५ फूट आकाराचा भव्यदिव्य बॅनर लावला आहे. त्यावर ६ हजार ५०० समर्थकांचे फोटो छापले आहे. या पोस्टरबाजीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

या पोस्टरमधून अमोलभाऊ देवरामशेठ लांडे यांना सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. याचबरोबर या पोस्टरवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे यांचे फोटो आहेत.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड परिसरात बॅनरबाजी झालेली आहे.यामध्ये बस स्टॉपची चोरी, नगरसेवक गायब, प्रेयसीचे नाव लिहून प्रेमाची कबुली देणारे, वा माफी मागणाऱ्या अशा काही बॅनरचा समावेश होता.

 

तसेच दोन वर्षांपुर्वी मनसेने असेच पोस्टर लावून पोलीस स्थानक चोरीला गेले असल्याचे म्हटले होते. कारण त्यांचे म्हणणे होते की, त्या स्थानकातील पोलीसांकडून नीट काम होत नव्हते त्यामुळे मनसेने हे पाऊल उचलले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!