---Advertisement---

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षणावर भर द्या,जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या प्रशासनाला सूचना

Follow Us:
---Advertisement---

            सोलापूर, दि.7 : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीबरोबर त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि कौशल्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अल्पसंख्याक सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, मनपा उपायुक्त जमीर लेंगरेकर, प्रशासन अधिकारी कादर शेख, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक चाँदमिया बिराजदार, मनपाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, कौशल्य विकास, पोलीस, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            यावेळी अल्पसंख्याक विद्यार्थी, युवक यांच्यासाठी काम करीत असलेल्या शासकीय यंत्रणांचा आढावा श्री. शंभरकर यांनी घेतला.  शासन निर्णयानुसार मुस्लिम, जैन, शिख, ख्रिश्चन, पारशी, ज्यू आणि बौद्ध समाजाचा अल्पसंख्याकमध्ये समावेश होतो. अल्पसंख्याक विद्यार्थी आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध पातळीवर काम करीत आहे. शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य यावर काय उपाययोजना करता येतील, यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बेरोजगार युवकांसाठी जास्तीत जास्त रोजगार मेळावे घेऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा, यासाठी प्रचार, प्रसार करण्याचाही प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. तसेच अल्पसंख्याक समाजातील धर्मगुरूंना भेटून त्यांनाही या कामात सामील करून घेतले तर शासनाला मदत होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!