अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावचे नागरिक पुण्यात व्यवसाय नोकरी निमित्त राहत असलेल्या वागदरीकरांनी एकत्र येऊन गेल्या दोन वर्षापासून पुणेकर वागदरीकर रहिवासी व्हाट्सप ग्रुपच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेत असतात.त्याचाच एक भाग म्हणून आपल्या गावातील गुणवान तरूण धावपटू अॅथलेटिक्स सोहेल वजीर नदाफ अतिशय गरीब परिस्थिती असून धावण्याच्या विविध स्पर्धेत उकृष्ठ कामगिरी करत वागदरीचे नाव गाजवत आहे.या पार्श्वभूमीवर त्याला या ग्रुपने मोठी मदत केली आहे.सध्या सोहेल नदाफ पुण्यात सराव करत असून त्याला ब्रँडेड कंपनीच्या स्पोर्ट्स साहित्याचे संपूर्ण किट सोहेल नदाफ याला भेट म्हणून देण्यात आले.
पंढरपूर मँरेथाँन स्पर्धेत पहिला क्रमांक,पुण्यात राज्यस्तरीय धावण्या च्या स्पर्धेत अनुक्रमे ८०० आणि १६०० मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.१८ वर्षाचा सोहेल बारावी शिकत असून इतक्या लहान वयात धावण्याच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.
घरीची परिस्थिती अतिशय हलाखीची असून वडील सध्या गावी मोलमजूरी करत असून सोहेल नदाफचे वडील वंजीर नदाफ वागदरी प्रसिद्ध पैलवान होते.घरच्या परिस्थिती मुळे त्याना हि कुस्तीमध्ये पुढे जाता आले नाही,त्याची खंत त्याना आहे.निदान मुलगा सोहेल तरी या क्षेत्रात पुढे जावे म्हणून प्रयत्न करत आहेत.
पुण्यातील वागदरीकरांनी एकत्र येऊन सर्वांनी थोडे पैसे गोळा करून सोहेल नदाफला मदतीचा आधार दिला आहे.स्पोर्ट्स साहित्याचे संपूर्ण किट देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.याच महिन्यात बेळगाव मध्ये खुले धावण्याच्या स्पर्धेत सोहेल भाग घेणार आहे.पुण्यातील वागदरीकरांनी सोहेलचे जबाबदारी घेत त्याला चांगल्या कोच मार्गदर्शकांची
व्यवस्था करणार आहेत.यावेळी प्रदीप जावळे,सोमेश्वर वाडी,दत्ता पोतदार,सातलिंग सलगरे,सचिन बंगरगी,धोंडपा नंदे उपस्थित होते.