---Advertisement---

मागण्या मान्य केल्याचे पत्र मिळताच अक्कलकोट रिपाईचे उपोषण मागे,उद्या पुन्हा बैठक होणार

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.१७ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.या संदर्भातील मागण्यांसाठी उद्या गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सलग तीन दिवस अन्यत्याग आंदोलनानंतर त्यातील सर्व मागण्या प्रशासनाकडुन पूर्ण करण्यात आल्या आहेत. तहसीलदार अंजली मरोड व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मोफत वाळु प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालय येथे वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक उद्या सकाळी ११ वाजता बोलावली असुन सदर प्रश्नी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन
त्यांनी दिले आहे.अक्कलकोट तालुक्यातील अनेक बांधकामे वाळु अभावी बंद आहेत तर तालुक्यातील वाळु टेंडर लवकरात लवकर काढुन वाळु उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
श्रावण बाळ योजना व निराधार योजनेच्या लाभार्थींना गेली दोन महिने त्याना अनुदान मिळाले नव्हते आज दोन महिन्याचे अनुदान बँकेसाठी वर्ग करण्यात आले आहे.
अक्कलकोट तहसिलदार यांनी सर्व मागण्या मान्य झाल्याचे पत्र देताच आर पी आय नेते राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशाने उपोषण मागे घेण्यात आले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक के.एस पुजारी, रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे,शहर अध्यक्ष प्रसाद माने,युवक तालुकाध्यक्ष अप्पा भालेराव,जिल्हा उपाध्यक्ष सोपान गायकवाड,जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी,तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड,चंद्रकांत गायकवाड,इरणा दसाडे,चंदू गायकवाड,प्रशांत सोनके,कृष्णा धोडमणी,राजु कांबळे राजु बोरगावकर,दत्ता कांबळे गुंडाप्पा कांदे,विजयकुमार पोतेनवरू, विजयकुमार गायकवाड,शुभम मडिखाबे,श्रीकांत गायकवाड,अंबादास शिंगे,नागेश मडिखांबे,सुरेश सोनकांबळे, शिवा जमगे शिवानंद धोडमणी,राजु वाघमारे,सचिन माळी,सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!