---Advertisement---

आगामी नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवू ; उमेश पाटील यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

On: December 14, 2020 11:59 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे.या ठिकाणी सर्व निर्णय हे जनहितासाठी घेतले जातात असे सांगून अक्कलकोट नगरपालिका निवडणूक यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवू,असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले.

अक्कलकोट येथे शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला भेट दिली.त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.अक्कलकोट तालुक्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरू आहे.त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष खंबीरपणे उभा आहे, येणारी नगरपालिका निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी आतापासूनचसर्वांनी कामाला लागावे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे विकासाला कोणतीही अडचण येणार नाही,असेही पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट मध्ये झालेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज निकम,कार्याध्यक्ष  माणिक बिराजदार,विक्रांत पिसे,अविराज सिद्धे,शंकर पाटील,शिवराज स्वामी,आबा सोमवंशी, मोनू सुतार, सागर सोमवंशी, सागर शिंदे, श्रीशैल चितली, सौरभ लांडगे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!