---Advertisement---

आदर्श शिक्षक व सेवा पुरस्काराचे उद्या अक्कलकोटमध्ये होणार वितरण

On: February 1, 2021 4:13 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (प्रतिनिधी) : मातंग एकता आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष वसंत देडे यांच्यवतीने मंगळवार २ फेब्रुवारी रोजी साय ५ वा . बसस्थानक जवळील लोकापुरे मल्टीपर्यज हॉल येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श सेवा पुरस्कार वितरण सोहळा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवर अतिथीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक इस्माईल जमादार यांनी दिली

पुस्कार वितरण सोहळा विश्व फौडेशनचे अध्यक्ष डॉ पुरुषोत्तम राजीमवाले माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे सभापती सुनंदाताई गायकवाड नगराध्यक्षा शोभा खेडगी  डॉ शिवाजी  शिंदे जिप सदस्य शिवानंद पाटील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्र्वस्थ अमोलराजे भोसले, वटवृक्ष स्वामी  महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, पो .नि.के.एस पुजारी आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे या सोहळयास नागरिकानी उपस्थित राहुन पुरस्कार वितरण सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन मातंग एकता आंदोलनाचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत देडे यांनी केले आहे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!