ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.हितेंद्र ठाकूरांच्या विवा ग्रूपवर ईडीची धाड

मुंबई : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या विवा ग्रुपवर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. त्यानुसार ईडीने आज विवा ग्रुपच्या कार्यालयांवर छापेमारी केल्याचे सांगण्यात येत आहे.  पीएमसी घोटाळ्यात ५ ते ६ कोटींचं मनीलॉन्ड्रिंग झालं असून त्यातील काही रक्कम विवा संस्थेत गुंतवण्यात आले असल्याचा संशय ईडी अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार ईडीने आज विवा ग्रुपच्या कार्यालयांवर छापेमारी केली आहे.

दरम्यान, सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची वसई-विरार भागात छापेमारी सुरू आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने शुक्रवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पाच ठिकाणी धाडी टाकल्या असून यात ईडीच्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे कागदपत्रे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच, अजूनही ही छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येतेयं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!